भेटवस्तू आणि मनोरंजन — सरकारी अधिकारी — लाचलुचपत आणि भ्रष्टाचार विरोधी
या विभागात, आम्ही पुढील गोष्टी कव्हर करू:
भेटवस्तू आणि मनोरंजन — सरकारी अधिकारी — लाचलुचपत आणि भ्रष्टाचार विरोधी
आमची बांधिलकी
व्यवसाय बैठकांमध्ये भेटवस्तू किंवा आदरातिथ्य करताना किंवा स्वीकारताना आम्ही योग्य निर्णय, विवेक आणि संयम वापरतो. एखादा निर्णय पक्षपात करण्याच्या हेतूसह असेल तर किंवा कोणत्याही व्यवसाय, सेवा किंवा गोपनीय माहितीच्या बदल्यात आम्ही भेटवस्तू, मेजवानी किंवा आदरातिथ्य स्वीकारत नाही किंवा प्रदान करत नाही.
आमच्या यशासाठी मजबूत वैयक्तिक आणि व्यावसायिक संबंध महत्त्वाचे आहेत. भेटवस्तू देणे आणि आदरातिथ्य करण्याच्या पद्धती वेगवेगळ्या संस्कृतींमध्ये वेगवेगळ्या असतात. तथापि, दिलेल्या किंवा मिळालेल्या कोणत्याही भेटवस्तू आणि आदरातिथ्य हे Jabil च्या धोरणांमध्ये नमूद केलेल्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार पूर्वमंजूर केलेले असणे आवश्यक आहे आणि त्यांनी लागू कायद्यांचे पालन करणे आवश्यक आहे.
खालील पद्धतींना कधीही परवानगी नाही:
एक पुरवठादार मला कॉन्फरन्समध्ये सहभागी होण्यासाठी सर्व खर्च देण्याची ऑफर देत आहे. मी स्वीकारू शकतो/शकते का?
पुरवठादार, ग्राहक किंवा तृतीय पक्षाद्वारे तुम्हाला ऑफर केलेली कोणतीही मौल्यवान गोष्ट वाजवी आणि प्रथागत असावी आणि आमच्या जागतिक लाचलुचपत प्रतिबंधक आणि भ्रष्टाचारविरोधी धोरण आणि व्यावसायिक लाचलुचपत प्रतिबंधक मार्गदर्शक तत्त्वांमधील आमच्या भेटवस्तू, मेजवानी आणि आदरातिथ्य मार्गदर्शनाशी सुसंगत असावी. अशी ऑफर तुम्ही नेहमी तुमच्या पर्यवेक्षकाकडे उघड करावी आणि स्वीकारण्यापूर्वी पूर्व संमती मिळवावी. तुम्हाला प्रश्न असल्यास, धोरणाचे पुनरावलोकन करा किंवा जागतिक नैतिकता आणि अनुपालन कार्यसंघ याकडून मार्गदर्शन मिळवा.
सरकारी अधिकाऱ्यांशी व्यवहार करताना विशेष काळजी घ्यावी लागेल. जटिल नियम सरकारी अधिकाऱ्यांना भेटवस्तू आणि मेजवानी देण्याचे नियमन करतात (ज्यात सरकारी मालकीच्या संस्थांचे कर्मचारी समाविष्ट आहेत). व्यावसायिक ग्राहकांना जे अनुज्ञेय असू शकते ते सरकारशी व्यवहार करताना बेकायदेशीर असू शकते.
सुट्टीच्या काळात मी माझ्या ग्राहकांना आणि पुरवठादारांना भेटवस्तू देऊ इच्छितो/इच्छिते. हे स्वीकारले जाईल का?
Jabil ज्या देशात कार्यरत आहे त्या प्रत्येक देशासाठी कंपनीच्या वतीने भेटवस्तू देताना, आमच्या जागतिक लाचलुचपत प्रतिबंधक आणि भ्रष्टाचारविरोधी धोरण आणि व्यावसायिक लाचलुचपत प्रतिबंधक मार्गदर्शक तत्त्वांमधील भेटवस्तू, मेजवानी आणि आदरातिथ्य मार्गदर्शन, वाजवी आणि प्रथागत मर्यादा प्रदान करते. धोरणामधील मर्यादा ओलांडणारी कोणतीही भेट धोरणामध्ये वर्णन केलेल्या प्रक्रियेद्वारे पूर्वमंजूर केलेली असणे आवश्यक आहे.
मार्गदर्शक तत्त्वे
लाचलुचपत प्रतिबंधक व्यावसायिक मार्गदर्शक तत्त्वेपुढील विभागात, आम्ही या गोष्टी कव्हर करू:
पुरवठादार निवडणे — व्यवसाय भागीदार नैतिकता — पुरवठादार आचारसंहिता