आमचे जग

आम्ही लाचखोरी आणि भ्रष्टाचार रोखतो

या विभागात, आम्ही पुढील गोष्टी कव्हर करू:

लाचलुचपत प्रतिबंधक आणि भ्रष्टाचार विरोधी — सुविधा पेमेंट — सरकारी अधिकारी

Two Jabil employees walking through component warehouse

आमची बांधिलकी

नेहमी सचोटीने काम करा. आम्ही कोणालाही लाच देत नाही किंवा कोणाकडूनही स्वीकारत नाही, विशेषत: सरकारी अधिकाऱ्यांना – आणि लक्षात ठेवा, आपण केवळ आपल्या कृतींसाठीच नाही, तर Jabil चे प्रतिनिधित्व करणाऱ्या प्रत्येकाच्या कृतीसाठीही जबाबदार आहोत.

आमच्यासाठी हे सोपे आहे: कोणाकडूनही, कधीही, लाच देणे किंवा स्वीकारणे नेहमी चुकीचेच असते.

ते का महत्त्वाचे आहे

लाचखोरी आणि भ्रष्टाचार या गोष्टी Jabil च्या मूल्यांचे, आमच्या आचारसंहितेचे आणि आम्ही ज्या देशांत काम करतो त्या देशांच्या कायद्यांचे उल्लंघन करतात. आम्ही आमच्या कर्मचाऱ्यांचे आणि आमच्या प्रतिष्ठेचे रक्षण करून भ्रष्टाचारापासून संरक्षण करतो आणि केवळ अशा व्यावसायिक भागीदारांसोबत काम करतो ज्यांची सचोटीची वचनबद्धता आमच्या समान आहे.

कोणत्याही Jabil कर्मचारी, Jabil पुरवठादार किंवा Jabil ग्राहक यांना किकबॅक किंवा लाच देणे यासह, सरकारी अधिकाऱ्याने लाच घेणे आणि व्यावसायिक कर्मचाऱ्यांने लाच घेणे, या आचरसंहितेद्वारे प्रतिबंधित आहे.

आम्ही योग्य प्रकारे कसे काम करतो

  • अयोग्य पेमेंट नाहीत

    लाच किंवा किकबॅक देऊ नका किंवा स्वीकारू नका, सुविधा पेमेंट देऊ नका किंवा इतर कोणत्याही प्रकारचे अयोग्य पेमेंट स्वीकारू किंवा देऊ नका.

  • पूर्वमंजुरी मिळवा

    जेवण, करमणूक आणि भेटवस्तू यांसह कोणत्याही सरकारी-संबंधित खर्चासाठी (आमच्या जागतिक लाचलुचपत प्रतिबंधक आणि भ्रष्टाचार विरोधी धोरणात नमूद केल्यानुसार) उघड करा आणि पूर्वमंजुरी मिळवा.

  • अचूक पुस्तके

    अचूक पुस्तके आणि नोंदी ठेवा जेणेकरून पेमेंटचे प्रामाणिकपणे वर्णन आणि दस्तऐवजीकरण करता येईल.

  • जागरूक रहा

    लाचेची तक्रार न करणे हे या आचारसंहितेचे उल्लंघन आहे याची जाणीव ठेवा.

  • लाचखोरी विरोधी

    आमच्या वतीने सेवा प्रदान करणाऱ्या इतरांची निवड करताना आमच्या लाचलुचपतविरोधी आणि भ्रष्टाचारविरोधी मानकांचे अनुसरण करा. सावध रहा आणि त्यांच्या वर्तनावर लक्ष ठेवा. कधीही “दुसरा मार्ग शोधू नका.” सर्व सेवा तपशिलवार आणि काळजीपूर्वक करार, कार्यक्षेत्र, खरेदी ऑर्डर आणि बीजकांमध्ये दस्तऐवजीकरण केल्या पाहिजेत.

  • कुटुंबातील सदस्य

    हे जाणून घ्या की सरकारी अधिकाऱ्याच्या कुटुंबीयांना दिलेल्या भेटवस्तू लाच मानल्या जाऊ शकतात.

लाचखोरी आणि भ्रष्टाचाराचा जागतिक प्रभाव

आम्हाला माहीत आहे की लाच दिल्याने आमच्या प्रतिष्ठेला हानी पोहोचू शकते आणि लाखोंचा दंड आणि शुल्क आकारले जाऊ शकते – परंतु येथे आणखी काही धोकेही आहेत. ज्या कंपन्या लाच देतात त्यांची उत्पादने आणि सेवा आमच्यापेक्षा निकृष्ट असली तरीही व्यवसायिक कामे मिळवू शकतात. शिवाय, भ्रष्टाचार विशेषतः विकसनशील देशांमध्ये हानिकारक आहे, जेथे लाच आणि भ्रष्टाचाराचा पैसा अनेकदा भ्रष्ट राजवटीला मदत करतो.

या सर्व कारणांमुळे आपल्याकडे लाचखोरी आणि भ्रष्टाचाराबाबत शून्य-सहनशीलता धोरण आहे. हे केवळ बेकायदेशीर नाही, तर ते आमच्या व्यवसायाच्या पूर्णपणे विरुद्ध आहे.

आमच्या काही क्रियाकलापांमध्ये लाचखोरी आणि भ्रष्टाचाराचा धोका जास्त असतो. तुमचा स्थानिक सरकारी अधिकारी आणि एजन्सीशी संपर्क येत असल्यास, जसे की इमारत परवाना एजन्सी; सुरक्षा निरीक्षक; अग्निशमन विभाग; पर्यावरणीय, कामगार, विद्युत, पाणी आणि गटार निरीक्षक किंवा आंतरराष्ट्रीय सरकारी संस्था, त्यावेळी तुम्ही विशेषत: सतर्क असले पाहिजे. सावधगिरी बाळगा आणि सरकारभिमुख विक्रेत्यांसाठी आवश्यक पूर्व-मंजुरी मिळवा, कारण तेथे सर्वाधिक धोका असण्याची शक्यता असते. आमच्या धोरणांचे पुनरावलोकन करा आणि कोणत्याही प्रश्नांसाठी जागतिक नैतिकता आणि अनुपालन कार्यसंघ याच्याशी संपर्क साधा.

यामध्ये काय आहे

लाच म्हणजे कोणतीही मौल्यवान गोष्ट जी व्यवसाय किंवा आर्थिक किंवा व्यावसायिक फायदा मिळविण्यासाठी सरकारी किंवा खाजगी क्षेत्रातील एखाद्याच्या वर्तनावर प्रभाव टाकण्यासाठी दिली जाते. लाच ही रोख रकमेव्यतिरिक्त काहीही असू शकते. भेटवस्तू, पक्षपात किंवा कर्ज किंवा नोकरीची ऑफरदेखील लाच मानली जाऊ शकते. काहीही मूल्यवान ऑफर करण्यापूर्वी, आमची धोरणे पहा आणि काय स्वीकार्य आहे (आणि काय नाही) याबद्दल प्रश्न विचारा.

सरकारी अधिकारी यामध्ये सरकारच्या कर्मचाऱ्यांचा समावेश होतो, परंतु याशिवाय या शब्दात सरकारी मालकीच्या व्यवसायांचे कर्मचारी तसेच पक्षाचे अधिकारी, राजकीय पदाचे उमेदवार, राजघराण्याचे सदस्य आणि जागतिक बँक यासारख्या आंतरराष्ट्रीय संस्थांचे कर्मचारी यांचादेखील समावेश होतो.

सुविधा पेमेंट ही कमी दर्जाच्या सरकारी अधिकाऱ्याला दिलेली छोटी पेमेंट असतात ज्याचा उद्देश त्या अधिकाऱ्याला आधीच कायदेशीररीत्या बंधनकारक असलेल्या जबाबदाऱ्या पार पाडण्यासाठी प्रोत्साहित करण्याचा हेतू असतो.

योग्य प्रकारे काम करणे – कृती करणे

मी अशा देशात काम करतो/ करते, जेथे लाचखोरी आणि भ्रष्टाचाराचा धोका जास्त मानला जातो. आम्ही एका सल्लागारासाठी पैसे देण्याचा विचार करत आहोत जो U.S. स्थानिक सरकारसोबत काम करतो व त्यांना कधीकधी मीटिंगमध्ये सहभागी होण्यासाठी U.S. ला जावे लागते. आम्ही मीटिंगनंतरच्या कॉन्सर्टचे तिकीटदेखील देऊ. याला परवानगी आहे का?

तुम्ही जागतिक नैतिकता आणि अनुपालन कार्यसंघ यासोबत परिस्थितीचे पुनरावलोकन करणे आवश्यक आहे. U.S. मध्ये आणि UK लाचलुचपत कायद्यांतर्गत सरकारी अधिकाऱ्याची व्याख्या स्थानिक कायद्यापेक्षा विस्तृत असू शकते आणि त्यात स्थानिक सरकारने ठेवलेल्या सल्लागारांचा समावेश असू शकतो. असे असल्यास, प्रस्तावित कार्यक्रमाची तिकिटे व्यवसायाशी संबंधित नसल्याने मंजूर केली जाणार नाहीत.

योग्य प्रकारे काम करणे – कृती करणे

एका नवीन प्रकल्पासाठी आवश्यक असलेल्या स्थानिक परवानग्या मिळवण्यात मदत करण्यासाठी मला सल्लागार नेमण्यासाठी अधिकृत केले गेले. “प्रक्रिया पुढे नेण्यात मदत करण्यासाठी” त्यांनी $40,000 रिटेनरची मागणी केली. मी हे पेमेंट मान्य करावे का?

नाही. नाही. सल्लागाराला काम देण्याआधी, तुम्हाला जागतिक नैतिकता आणि अनुपालन कार्यसंघ याकडून मार्गदर्शन घेणे आवश्यक आहे आणि सल्लागाराची सावधतेने निवड करणे आवश्यक आहे. कोणतेही पेमेंट करण्यास सहमती देण्यापूर्वी, पैसे कसे वापरले जातील हे आम्हाला जाणून घेणे आवश्यक आहे. संभाव्य सरकारभिमुख सेवांमध्ये आपण कुठल्याही प्रकारची अस्पष्टता टाळली पाहिजे. सर्व सेवांचे करार, कार्यक्षेत्र, खरेदी ऑर्डर आणि पावत्यांमध्ये तपशीलवार आणि काळजीपूर्वक दस्तऐवजीकरण केलेले असणे आवश्यक आहे. हा पैसा लाच किंवा सुविधा पेमेंट म्हणून वापरला जाणार नाही याची Jabil ने खात्री करणे आवश्यक आहे. तुम्ही काहीही करण्यापूर्वी तुम्ही याबद्दल जागतिक नैतिकता आणि अनुपालन कार्यसंघ याच्याशी बोलणे आवश्यक आहे.

योग्य प्रकारे काम करणे – कृती करणे

एका संभाव्य पुरवठादाराने मला त्यांना Jabil च्या मंजूर विक्रेता सूचीमध्ये (AVL) जोडण्यासाठी $1,000 देऊ केले. ते काम करण्यास पात्र आहेत आणि त्यांची किंमत स्पर्धात्मक आहे. मला पैसे घेऊन Jabil साठी AVL मध्ये पुरवठादार जोडता येऊ शकतो का?

नाही, तुम्ही हे करू शकत नाही. पैसा किंवा इतर कोणतीही मौल्यवान वस्तू ही लाच मानली जाते. लाच ही कोणतीही मौल्यवान गोष्ट असू शकते जी व्यवसाय किंवा व्यावसायिक फायदा मिळविण्यासाठी एखाद्याच्या वर्तनावर प्रभाव टाकण्यासाठी दिली जाते. जागतिक नैतिकता आणि अनुपालन कार्यसंघ याच्याशी संपर्क साधा किंवा Jabil इंटिग्रिटी हॉटलाइनशी संपर्क साधा जेणेकरून या प्रकरणाचे मूल्यांकन करता येईल.

पुढील विभागात, आम्ही या गोष्टी कव्हर करू:

सरकारी अधिकारी प्राप्ती सरकारी चौकशी

वाचत रहा

आम्ही सरकारसोबत जबाबदारीने काम करतो