वर्कप्लेसची सुरक्षितता — शारीरिक आरोग्य — मानसिक आरोग्य
या विभागात, आम्ही कव्हर करू:
वर्कप्लेसची सुरक्षितता — शारीरिक आरोग्य — मानसिक आरोग्य
आमची बांधिलकी
आमच्या लोकांचे शारीरिक आणि मानसिक आरोग्य हे आमचे पहिले प्राधान्य आहे. आमचे सहकारी, कंत्राटदार आणि अभ्यागत सुरक्षित आहेत याची खात्री करण्यासाठी आम्ही एकमेकांची काळजी घेतो.
प्रत्येकाला निश्चिंत, निरोगी आणि सुरक्षित ठेवण्यापेक्षा महत्त्वाचे काहीही नाही. जागरुक राहण्याची, कार्यपद्धतींचे अनुसरण करण्याची आणि एखाद्या गोष्टीची चिंता निर्माण झाल्यास बोलण्याची आमची सामायिक आणि वैयक्तिक जबाबदारी आहे.
सुरक्षित कामाचे वातावरण राखण्यात मदत करा आणि कामाच्या ठिकाणी होणाऱ्या दुखापती कमी करण्यासाठी आणि टाळण्यासाठी सक्रिय रहा.
तुम्ही जिथे काम करता तिथे लागू होणाऱ्या आपत्कालीन आणि सुरक्षितता प्रक्रिया जाणून घ्या.
सुरक्षितता किंवा पर्यावरणीय प्रक्रियां कधीही टाळू नका किंवा “वर्क-अराउंड” करू नका.
प्रिस्क्रिप्शन आणि ओव्हर-द-काउंटर औषधांसह, अल्कोहोल किंवा कोणत्याही ड्रग्जच्या अमलाखाली असताना Jabil व्यवसायाची हाताळणी करू नका.
कंपनी व्यवसायाच्या ठिकाणी वाहन चालवताना कधीही ईमेल करू नका, इंटरनेट किंवा मजकूर तपासू नका.
कंत्राटदार आणि व्यावसायिक भागीदारांना आमची सुरक्षा आणि पर्यावरणीय प्रक्रिया समजून घेण्यात आणि त्यांचे पालन करण्यात मदत करा.
कोणत्याही असुरक्षित परिस्थितीबद्दल तुमच्या पर्यवेक्षकांना सतर्क करा.
कितीही किरकोळ का असेना, काम करताना झालेल्या दुखापतींची तत्काळ पर्यवेक्षकाकडे तक्रार करा. अहवाल दुसऱ्या कोणीतरी तयार केला असेल असे कधीही समजू नका.
तुम्ही पर्यवेक्षक असल्यास, कामाच्या ठिकाणी झालेल्या दुखापतींची तक्रार न करण्यासाठी कर्मचाऱ्यांवर कधीही दबाव आणू नका.
कोणत्याही प्रकारच्या हिंसाचाराला Jabil येथे स्थान नाही. आम्ही आमचे कर्मचारी आणि आमच्या संस्थेला भेट देणाऱ्यांसाठी सुरक्षित कामाचे वातावरण देण्यासाठी वचनबद्ध आहोत. आम्ही हे सहन करणार नाही:
पुढील विभागात, आम्ही कव्हर करू:
शाश्वतता — संसाधनांचे संरक्षण करणे — पर्यावरणविषयक नियम