आमचे ग्राहक आणि भागीदार

आम्ही हितसंबंधांचे संघर्ष टाळतो

या विभागात, आम्ही पुढील गोष्टी कव्हर करू:

संभाव्य संघर्ष – प्रकटीकरण – व्यवसायाशी संबंधित चांगले निर्णय

आमची बांधिलकी

व्यवसायाशी संबंधित चांगले निर्णय घेताना आम्ही कधीही वैयक्तिक हितसंबंध आड येऊ देत नाही. आम्ही अशा सर्व परिस्थिती टाळतो ज्यामुळे हितसंबंधामध्ये किंचितही संघर्ष होऊ शकतो.

ते का महत्त्वाचे आहे

हितसंबंधांचे संघर्ष आपल्या प्रतिष्ठेला हानी पोहोचवू शकतात. निःपक्षपाती, नैतिक निर्णय घेतल्याने आमच्या व्यवसायाला मदत होते आणि आमच्या व्यवसाय भागीदार व समुदायांमध्ये विश्वास निर्माण होतो.

Two Jabil employee walking and talking on the factory floor

आम्ही योग्य प्रकारे कसे काम करतो

  • जाणून घ्या

    हितसंबंधातील संघर्ष ओळखण्यास शिका – जे आम्हाला ते टाळण्यास मदत करतात.

  • लक्षात ठेवा

    लक्षात ठेवा की संघर्ष होऊ शकतो – विवाद उघड करणे महत्त्वाचे आहे जेणेकरून व्यवस्थापक त्यांचे व्यवस्थापन किंवा निराकरण करण्यात मदत करू शकतील.

  • टाळा

    हितसंबंधांतील संघर्षास किंचितही कारणीभूत ठरू शकतील अशा परिस्थिती सक्रियपणे टाळा.

  • अनुसरण करा

    संभाव्य संघर्ष उघड करण्यासाठी आणि निराकरण करण्यासाठी विहित प्रक्रियेचे अनुसरण करा.

  • संपर्क साधा

    प्रश्नांसह जागतिक नैतिकता आणि अनुपालन कार्यसंघ याच्याशी संपर्क साधा.

यामध्ये काय आहे

संघर्ष दर्शवू शकणाऱ्या प्रत्येक परिस्थितीची यादी करणे शक्य नाही, परंतु अशा काही विशिष्ट परिस्थिती आहेत जेथे संघर्ष उद्भवू शकतात. उदाहरणांमध्ये हे समाविष्ट आहे:

Jabil सोबत व्यवसाय करणाऱ्या किंवा Jabil च्या व्यवसायावर परिणाम करू शकते अशा कंपनीमध्ये आर्थिक हितसंबंध ठेवणे.यामध्ये आपले स्वतःचे तसेच आपल्या कुटुंबातील सदस्य किंवा जवळच्या वैयक्तिक मित्रांच्या आर्थिक हितसंबंधांचा समावेश आहे.

  • तुम्ही प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे ज्याला रिपोर्ट करता अशा एखाद्याशी डेटिंग करणे किंवा त्याच्याशी रोमँटिक किंवा लैंगिक संबंध ठेवणे.
  • कुटुंबातील सदस्य किंवा जवळच्या वैयक्तिक मित्राचा फायदा करून देणारे Jabil व्यावसायिक निर्णय घेणे किंवा प्रभावित करणे.
  • जोडीदार, घरगुती किंवा नागरी भागीदार, नातेवाईक किंवा जवळच्या वैयक्तिक मित्रासोबत व्यवसाय करणे किंवा नोकरी करणे. यामध्ये हे समाविष्ट आहे: रक्ताचे नाते असलेले, विवाह किंवा दत्तक प्रक्रियेव्दारे असले तरीही आई, वडील, भावंड, मुले, भाची/पुतणे, आजी आजोबा, चुलत भाऊ आणि काकू/काका.
  • ग्राहक किंवा पुरवठादाराच्या कुटुंबातील सदस्याला रोजगार देणे.

  • Jabil मधील तुमच्या नोकरीमध्ये व्यत्यय आणू शकेल किंवा ते काम करण्यासाठी तुम्हाला Jabil मधील कामाचे तास किंवा मालमत्ता वापरण्यास प्रवृत्त करेल असे काम करणे.
  • Jabil शी स्पर्धा करणाऱ्या किंवा कोणत्याही प्रकारे Jabil सोबत व्यवसाय करणाऱ्या कंपनीत दुसरी नोकरी करणे.
  • बाहेरील व्यवसायाला प्रोत्साहन देण्यासाठी किंवा मदत करण्यासाठी Jabil च्या मालमत्ता किंवा प्रभावांचा गैरवापर करणे.

योग्य प्रकारे काम करणे – कृती करणे

एका सहकाऱ्याचा मुलगा आमच्या कार्यसंघामध्ये नोकरीसाठी अर्ज करत आहे. याला परवानगी आहे का?

भरती प्रक्रियेदरम्यान हे नाते व्यवस्थापन आणि HR यांना उघड केले पाहिजे. मुलाला कार्यसंघात पद देऊ केले तर, व्यवस्थापन आणि HR, आवश्यकतेनुसार जागतिक नैतिकता आणि अनुपालन कार्यसंघ याच्या मार्गदर्शनासह, संघर्ष दूर करण्यासाठी किंवा व्यवस्थापित करण्यासाठी काम करतील.

योग्य प्रकारे काम करणे – कृती करणे

माझ्या पती/पत्नीची एक कंपनी आहे जिला Jabil चे पुरवठादार व्हायचे आहे. मी काही केले पाहिजे का?

होय. या नातेसंबंधात हितसंबंधातील संघर्ष निर्माण होऊ शकतो ज्याचे Jabil ने पुनरावलोकन करणे आवश्यक आहे. हितसंबंधातील संघर्ष धोरणाचे पुनरावलोकन करा आणि वर्णन केलेल्या प्रक्रियेचा वापर करून संभाव्य संघर्ष उघड करा.

योग्य प्रकारे काम करणे – कृती करणे

एका पुरवठादाराच्या कर्मचाऱ्याने विचारले, की तो Jabil येथे नोकरीसाठी आपल्या मुलीची शिफारस करू शकतो का. मी काय केले पाहिजे?

पुरवठादाराची मुलगी Jabil येथे नोकरीसाठी अर्ज करू शकते, परंतु नोकरीच्या प्रक्रियेदरम्यान तिचे कंपनीशी असलेले नाते व्यवस्थापन आणि HR यांना उघड केले पाहिजे.

पुढील विभागात, आम्ही या गोष्टी कव्हर करू:

भेटवस्तू आणि मनोरंजन — सरकारी अधिकारीलाचलुचपत आणि भ्रष्टाचार विरोधी

वाचत रहा

आम्ही आमची भेटवस्तू आणि मनोरंजन मार्गदर्शक तत्त्वे यांचे पालन करतो